आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षसंघटन मजबूत व्हावे आणि राज्य अधिवेशनातील बाबींची नियोजनबद्ध कार्यवाही व्हावी या उद्देशाने, हॉटेल बर्ड व्हॅली, वाकड येथे चिंचवड विधानसभा विस्तृत मंडल कार्यकारणी अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख या नात्याने, कार्यकर्त्यांशी यानिमित्ताने मनमोकळेपणाने संवाद साधला.
रहाटणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेश आप्पा खुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित होतो. नरेश आप्पा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी, भाजप शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप यांच्यासह मा.नगरसेविका सौ. सविताताई खुळे, मा.नगरसेवक श्री.बाबासाहेब त्रिभूवन, मा.स्वीकृत सदस्य श्री.विनोद तापकीर, श्री.संदीप गाडे, श्री.दीपक जाधव आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व राहटणीकर उपस्थित होते.
आता नव्या रूपात पुण्याची वाहिनी आपल्या सेवेत..! पीएमपीएल चा प्रवास होणार आता सुखकर कारण आता प्ले स्टोअरवरून मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिकीट बुक करा. सर्वकाही एकाच क्लिकवर..! यामध्ये आपल्याला खालील सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहना नुसार, सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान हर-घर-तिरंगा मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या निवासस्थानी तिरंगा फडकवून, हर-घर-तिरंगा मोहिमेमध्ये सहभाग घेतला.